Autobiography of a tree in marathi language

Zadachi atmakatha in marathi: मित्रांनो झाड हे निसर्गाने मनुष्याला दिलेले अत्यंत अनमोल उपहार आहे. परंतु वाढत्या आधुनिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत आहे. म्हणूनच झाडे लावा झाडे जगवा चे महत्व आपण समजायला हवे.

आजच्या या लेखात मी तुम्हाला झाडाची आत्मकथा / मी वृक्ष बोलतोय आत्मकथन निबंध मराठी देणार आहे.

या लेखात एक झाड त्याची व्यथा व त्याच्या जीवनातील आनंद अन् दुखाचे क्षण आपल्यासमोर मांडणार आहे.

झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी-  Zadachi atmakatha in marathi

मी एक झाड बोलतोय. मी आकाराने खूप मोठा आहे आणि मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी देखील आहे, माझे नेहमी आनंदी राहण्यामागील कारण असे आहे की भूतलावरील इतर सजीव जीवांना माझ्यामुळे भरपूर लाभ होत असतात.

मी मनुष्याला ऑक्सिजन प्रदान करतो आणि स्वतः कार्बन डायऑक्साइड ग्रहण करतो, पण तरीही कधी कधी काही लोक मला त्रास देतात. मी शांतपणे रस्त्याच्या एका बाजूला उभा असतो, जाणारे येणारे लोक नेहमी माझ्या सावलीत विसावा घेत बसतात.

उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा घामाने शरीर थकते तेव्हा लोक माझ्या सावलीत येऊन बसतात. माझ्या सावलीत बसून त्यांना आनंद मिळतो, यासाठी ते मला धन्यवाद देखील करतात.

त्यांचा धन्यवाद ऐकुन मला खूप बरे वाटते व इतरांच्या कामी आल्याचा आनंद होतो. पण दुसरी कडे असाही विचार करत बसतो की, काही लोक विनाकारण माझ्या फांद्या आणि पाने तोडत असतात. काही लोक आपल्या लहानश्या स्वार्थासाठी मला पूर्णपणे नष्ट करून टाकतात. मी आज आकाराने खूप मोठा झालो आहे ज्यामुळे कोणताही मनुष्य किंवा प्राणी मला सहज नुकसान पोहचू शकत नाही.

बरेच लोक रस्त्याच्या कडेला मला शांतपणे उभे असलेले पाहून माझी प्रशंसा करतात. ते म्हणतात की किती छान झाड आहे. काही लोक माझे फळ खाऊन त्यांची प्रशंसा करतात. काही प्राणी माझे खाली लोंबकलेल्या फांद्यांची पाने खातात, ते देखील माझ्यासाठी चांगली प्रार्थना करतात. मी वातावरणाला प्रदूषित होण्यापासून वाचवतो. माझ्या मुळांमधील मातीला घट्ट धरून ठेवतो.

माझे वय खूप जास्त असते, मी हजारो वर्षांपर्यंत एका उभा जागी राहू शकतो. परंतु मला या गोष्टीची बऱ्याचदा भीतीही वाटते. मला वाटते की जर कधीतरी एखाद्या मनुष्याने येऊन मला कापून टाकले तर? हा विचार करूनच माझ्या अंगावर शहारे येतात. मला नेहमी या एकाच गोष्टीची चिंता सतावत असते. कारण आजही जगात असे अनेक लोक आहेत जे स्वतः च्या स्वार्थासाठी झाडांना समूळ नष्ट करीत असतात.

ते या गोष्टीचा कधीही विचार करीत नाही की मी त्यांच्यासाठी किती उपयुक्त आहे. मला नुकसान पोहचवणे म्हणजे निसर्गाला नुकसान पोहचवणे होय. आणि निसर्गाला नुकसान होणे म्हणजे मनुष्य जीवनाला धोका होणे आहे.

माझ्या मदतीने अनेक लोक आपली उपजीविका भागवतात. काही लोकांचे व्यवसाय देखील माझ्या मुळेच सुरू आहेत.

  • Sample biography Centred words and running
  • लोक माझ्या फळांना तोडून बाजारात विक्रीसाठी नेतात आणि त्यांना विकून आपला व्यवसाय चालवतात. माझ्या शरीराचा प्रत्येक भाग काही न काही कामात येतो. पक्षी माझ्या दाट फांद्यांमध्ये आपली घरटी करतात.

  • Movies
  • हे पक्षी देखील माझी पाने तोडतात पण ते आपल्या गरजेपुरते माझा उपयोग करीत असतात, मला नष्ट करण्याचा त्यांचा अजिबात उद्देश नसतो.

    प्रत्येक जीवजंतू माझा उपयोग करून घेतो. पण तरीही मी प्रतिक्रिया न करता शांतपणे सर्व काही पाहत असतो. माझे वचन आहे की जोपर्यंत या पृथ्वीवर माझे अस्तित्व आहे तोपर्यंत मी मनुष्य आणि इतर प्राण्याची अशाच पद्धतीने सेवा करीत राहील, जरी काही लोक मला विनाकारण नष्ट करून माझी लाकडे विक्रीसाठी नेत राहतील तरी मी माझे सेवा कार्य अखंड सुरू ठेवील.

    समाप्त 

    या शिवाय या निबंधाला पुढील प्रमाणे शीर्षक देखील देता येईल.

    झाडाचे मनोगत 

    मी झाड बोलतोय 

    झाडाची आत्मकथा 

    मी वृक्ष बोलतोय 

    Tree diary in marathi

    तर मित्रांनो ही होती zadachi atmakatha in marathi/ mi vruksha boltoy marathi nibandh व झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी तुम्हाला हा मराठी निबंध कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा.

    व मराठी निबंध आणि भाषणे मिळवण्यासाठी भेट द्या आमची वेबसाइट bhasahnmarathi.com ला.

    Related posts 

    Tags:निबंध Marathi essay

    थोडे नवीन जरा जुने

    ").addClass("theiaStickySidebar").append(e.sidebar.children()),e.sidebar.append(e.stickySidebar)}e.marginBottom=parseInt(e.sidebar.css("margin-bottom")),e.paddingTop=parseInt(e.sidebar.css("padding-top")),e.paddingBottom=parseInt(e.sidebar.css("padding-bottom"));var n=e.stickySidebar.offset().top,s=e.stickySidebar.outerHeight();function d(){e.fixedScrollTop=0,e.sidebar.css({"min-height":"1px"}),e.stickySidebar.css({position:"static",width:"",transform:"none"})}e.stickySidebar.css("padding-top",1),e.stickySidebar.css("padding-bottom",1),n-=e.stickySidebar.offset().top,s=e.stickySidebar.outerHeight()-s-n,0==n?(e.stickySidebar.css("padding-top",0),e.stickySidebarPaddingTop=0):e.stickySidebarPaddingTop=1,0==s?(e.stickySidebar.css("padding-bottom",0),e.stickySidebarPaddingBottom=0):e.stickySidebarPaddingBottom=1,e.previousScrollTop=null,e.fixedScrollTop=0,d(),e.onScroll=function(e){if(e.stickySidebar.is(":visible"))if(i("body").width()